Reality Marathi Quotes On Life - जीवनावर वास्तववादी मराठी कोट्स. Reality Marathi Quotes On Life - जीवनावर वास्तववादी मराठी कोट्स. आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे जिथे प्रत्येक वळणावर संघर्ष असतो, प्रत्येक नात्यात एक नवी शिकवण असते आणि प्रत्येक अनुभव हा आपल्याला काहीतरी वेगळं शिकवून जातो. तुमच्या जीवनात कितीही लोक असले तरी शेवटी स्वतःशी सामना करणं हे सर्वात कठीण असतं. जग तुमच्यासोबत असतं, पण वेळ वाईट असली की अनेक वेळा तुम्हाला एकटंच उभं राहावं लागतं. हीच गोष्ट व्यक्त करण्यासाठी आम्ही Reality Marathi Quotes On Life हा संग्रह तयार केला आहे. ह्या संग्रहातील Quotes हि जीवनातील खरे वास्तव तुमच्यासमोर उभं करेल. ह्यातील Quotes तुमच्या आयुष्याशी जोडले गेलेली आहेत असा आभास होईल कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच आणि ते आपल्याला व्यक्त करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असते. 'आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण तुमची सावली पण अंधारात साथ सोडते' हा विचार बघाल तर किती खोल आहे! तो सांगतो की नाती असली तरी ...