Attitude Tomne Marathi Status - आपल्यावर जळणाऱ्यांना लोकांना उत्तर देणारे स्टेटस.
मित्रांनो, कधी कधी भावना थेट सांगण्यापेक्षा टोमण्याच्या स्वरूपात व्यक्त केल्या जातात. शब्द जरी थोडक्यात असले तरी त्यामागचा अर्थ खूप खोल असतो. अशा वेळेस काही वेळा समोरच्याला थेट उत्तर देण्याचा एक स्मार्ट मार्ग म्हणजे टोमणे स्वरूपात उत्तर देणं. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Attitude Tomne Marathi Status संग्रह ज्यामध्ये तुम्हाला तुमच्यावर जळणाऱ्यांना उत्तर देणारे स्टेटस पाहायला मिळतील.
आजच्या सोशल मीडियाच्या काळात WhatsApp Status हा भावना व्यक्त करण्याचा एक प्रभावी मार्ग बनला आहे. काही लोक Attitude दाखवण्यासाठी, काही लोकं टोमणे मारण्यासाठी किंवा आपला स्वभाव दर्शवण्यासाठी Marathi Attitude स्टेटस वापरतात. WhatsApp वर शेअर करण्यासाठी खास WhatsApp Attitude Tomne Marathi Status हा नवीन विभाग तयार केला आहे ज्यात टोमणे स्वरूपाचे आकर्षक स्टेटस तुम्हाला पाहायला मिळतील.
टोमणे मारणारे स्टेटस हे कधी मजेशीर असतात, तर कधी तिखट असतात; तर कधी वास्तव सांगणारे असतात. पण त्यामध्ये एक गोष्ट Common असते ती म्हणजे आत्मविश्वास. असे स्टेटस लोकांना आपली Personality दाखवायला मदत करतात. ह्या संग्रहातील काही स्टेटस अप्रत्यक्षपणे उत्तर देण्यासाठी वापरले जाऊ शकतात, तर काही Attitude दाखवण्यासाठी. त्यामुळे ह्या संग्रहातले स्टेटस लिहताना त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच हा संग्रह तयार करण्यात आला आहे.
या संग्रहामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील Attitude Tomne Marathi Status आणि WhatsApp Attitude Tomne Marathi Status विभाग जे तुमचा मनातल्या भावना टोमणे स्वरूपात व्यक्त करतील.
चला तर मग सुरुवात करूयात ह्या विशेष संग्रहाला.
Attitude Tomne Marathi Status
Attitude Tomne Marathi Status ह्या विभागातील स्टेटस हे स्वाभिमान, Confidence आणि Personality दर्शवतात. तर काही स्टेटस टोमणे स्वरूपात पाहायला मिळतील. अशा स्टेटस चा वापर तुम्ही WhatsApp Status, Instagram Story आणि Facebook Postवर करू शकता.
जळणारे जळणारच, कारण आमची प्रगती त्यांना कधीच पचणार नाही.
लायकीची गोष्ट आमच्यासमोर करू नकोस, कारण तुझी जिथे संपते तिथे आमची सुरू होते.
आम्हाला हरवणं तर लांबची गोष्ट आहे, पण आमच्याशी बरोबरी करायची पण तुझी स्वप्नातली गोष्ट आहे.
नाव खराब केल्याने काहीच होत नाही, कारण प्रसिद्धी ही कामातून मिळते, लोकांच्या बोलण्यातून नाही.
ज्यांना मी आवडत नाही, त्यांनी मला 'unfollow' केलं तरी चालेल, पण माझं स्टेटस बघून स्वतःला त्रास करून घेऊ नका.
वेळ प्रत्येकाची येते, फक्त आमची वेळ आल्यावर तुमचा इतिहास पुसला जाईल.
तुम्ही फक्त नाव ऐकलं असेल, कधी समोरून भेटलात तर ओळख विसरून जाल.
वाघ जखमी झाला तरी तो शिकार करणं सोडत नाही, आणि आम्ही शांत बसलो म्हणजे हार मानली असा होत नाही.
जे माझ्या मागे बोलतात त्यांना एकच सांगणं आहे, माझ्या समोर बोलायची तुमची हिंमत नाही हेच माझं यश आहे.
आम्ही शांत आहोत तोपर्यंत मज्जा करून घ्या, कारण ज्या दिवशी आम्ही सुरू करू त्या दिवशी तुमचं अस्तित्व संपलेलं असेल.
काही लोकांच्या आयुष्यात फक्त एकच काम असतं, दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसणं.
जळायला तर मेणबत्ती पण लागते, तुम्ही तर माणसं आहात मग का जळणार नाही?
बाप तर प्रत्येक जण असतो, पण साम्राज्य निर्माण करायला आमचाच नाद लागतो.
किंमत तर प्रत्येकाची असते, फक्त तुमची वेळ आली की आम्ही तुमची बोली लावू.
लोक म्हणतात बदलला आहेस तू, त्यांना कसं सांगू की आता मी स्वतःसाठी जगायला लागलोय.
तुझी उंची नडत नाही, तुझं विचार आणि कर्तृत्व खुजं आहे म्हणून तू मागे आहेस.
आम्ही फक्त त्याच लोकांसाठी उपलब्ध आहोत, ज्यांना आमची किंमत आहे.
शत्रू बनवायला जिगर लागते, आणि ती आमच्याकडे जन्मापासूनच आहे.
माझ्या वाटेला जाताना १० वेळा विचार करा, कारण मी परत आलो तर तुमची वाट लागलेली असेल.
आज जे दुर्लक्ष करतायत, उद्या तेच मला शोधत फिरतील.
माझी स्टाईल हीच माझी ओळख आहे, समजलं तर आदर द्या, नाहीतर रस्ता धरा.
स्वभाव आमचा जरा कडक आहे, म्हणून तर जगात आमची थोडी वेगळीच धमक आहे.
कोणासमोर झुकायची आम्हाला सवय नाही, आणि कोणाचं फालतू ऐकायची आमची लायकी नाही.
मी असाच आहे, आवडलो तर देव मान, नाहीतर गेम संपवून टाक.
स्वतःची ओळख स्वतःच निर्माण केलीय, कोणाच्या जीवावर उडायची आम्हाला कधी सवय नव्हती.
नशिबाने नाही, तर स्वबळावर इथपर्यंत आलोय.
लोक काय म्हणतील याचा विचार मी कधीच करत नाही, कारण माझं घर लोक चालवत नाहीत.
आरसा आणि मी दोघेही सारखेच आहोत, जो जसा वागतो त्याला तसंच उत्तर मिळतं.
आमची बरोबरी करायला डोकं नाही, तर काळीज लागतं.
शांतता ही आमची कमजोरी नाही, तर वादळ येण्यापूर्वीची ती एक सूचना आहे.
माझ्या शांत बसण्याचा अर्थ असा नाही की मी वाघ नाही, फक्त सध्या शिकार करायची इच्छा नाही.
आयुष्यात एकच नियम पाळायचा, कोणाचं खायचं नाही आणि कोणाला फालतू द्यायची नाही.
आम्ही नाद कोणाचाच करत नाही, पण एकदा का कोणाचा नाद केला की त्याला सोडत नाही.
कोणाचं 'Copy' करायची गरज आम्हाला नाही, कारण आमची प्रत्येक गोष्ट 'Original' असते.
प्रसिद्धीसाठी आम्ही कधी कोणाचे पाय धरले नाहीत, कष्ट केले म्हणून आज इथपर्यंत पोहोचलोय.
माणुसकी फक्त माणसांना दाखवतो, कुत्र्यांसमोर आम्ही कधी बिस्किट टाकायला जात नाही.
वाघाचं काळीज घेऊन जन्मलोय, कोल्ह्यांच्या ओरडण्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही.
हार मानली असती तर आज इतिहास झाला असता, पण मी संघर्ष केला म्हणून आज माझं नाव आहे.
नडणारे खूप भेटले, पण टिकणारा अजून कोणी जन्माला आला नाही.
ब्रँड तर कपड्यांचा पण असतो, पण माणुसकीचा ब्रँड फक्त आमच्याकडेच आहे.
काही माणसं फक्त नावाला आपली असतात, कामापुरतं जवळ येतात आणि काम झालं की विसरतात.
ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला, म्हणूनच आता फक्त स्वतःवर विश्वास आहे.
गरजा संपल्या की लोकांची बोलण्याची पद्धत बदलते, हे जगाचं सर्वात मोठं वास्तव आहे.
सापापेक्षा जहरी ती माणसं असतात, जी चेहऱ्यावर हसतात आणि मनात द्वेष ठेवतात.
लोक तुमचं वाईट त्याच वेळी करतात, जेव्हा ते तुमच्यासारखं बनू शकत नाहीत.
पैशाने घर सजवता येतं, पण संस्कार विकत घेता येत नाहीत.
वेळ खराब असली की कुत्रे पण अंगावर धावून येतात, पण वेळ बदलली की तेच शेपूट हलवत मागे येतात.
मलाई खाताना सगळे सोबत असतात, पण जेव्हा कडुनिंब खायची वेळ येते तेव्हा सगळे गायब होतात.
कोणाचं कितीही चांगलं करा, शेवटी लोक तुमच्या एका चुकीचीच वाट बघत असतात.
अनुभव सांगतोय, कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवू नका.
दिखावा करणारी माणसं जास्त दिवस टिकत नाहीत, वास्तव कधी ना कधी समोर येतच.
नाती जपली की लोक गृहीत धरतात, आणि नाती तोडली की लोक नाव ठेवतात.
मोठेपणा शब्दांतून नाही, तर कृतीतून दाखवावा लागतो.
काही लोकांचा स्वभाव म्हणजे 'गिरगिट', कधी रंग बदलतील सांगता येत नाही.
मदतीला धावणारा मी आहे, पण याचा अर्थ असा नाही की मला कोणीही वापरून घ्यावं.
ज्यांनी मला पडताना पाहिलं, त्यांनी आता माझं उडणं बघण्याची तयारी ठेवावी.
तुमची लायकी काय आहे हे मला विचारू नका, आरशात बघा तुम्हाला उत्तर मिळेल.
गर्दीत चालणं सोपं असतं, पण एकटं चालण्यासाठी ताकद लागते.
लोक म्हणतात तू खूप बदललास, मी म्हणतो मी सुधरायला सुरुवात केलीय.
रिकाम्या भांड्यांचा आवाज जास्त असतो, तसंच रिकाम्या डोक्याच्या लोकांचं बडबडणं जास्त असतं.
यश असं मिळवा की तुमचे शत्रू पण तुमचे फॅन होतील.
प्रगती एवढी करा की तुमचा नंबर ब्लॉक करणाऱ्यांनी तुम्हाला गुगलवर सर्च केलं पाहिजे.
आज जे हसतायत, उद्या तेच माझ्यासाठी टाळ्या वाजवतील.
शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही.
यशाचं शिखर गाठायचं असेल, तर खालून ओढणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा.
माझे कष्ट आणि माझा देव, तिसऱ्या कोणाची मला गरज नाही.
आज संघर्ष आहे म्हणून उद्या फळ मिळेल, हेच जीवनाचं गणित आहे.
स्वतःला सिद्ध करायची मला गरज नाही, माझं कामच माझं उत्तर आहे.
नशीब साथ देईल किंवा नाही, पण मेहनतीवर माझा पूर्ण विश्वास आहे.
जगाला नवल वाटेल असं काहीतरी करून दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
नाव तर प्रत्येकाचं असतं, पण दरारा फक्त आमचाच असतो.
तुमची फक्त हवा आहे, आमचा तर काळ आहे.
नडला तर फोडला!
ओळख कमी आहे, पण जिथे आहे तिथे कडक आहे.
किंमत करायची असेल तर लायकीत राहा.
WhatsApp Attitude Tomne Marathi Status
WhatsApp Attitude Tomne Marathi Status ह्या विभागातील स्टेटस समोरच्याला अप्रत्यक्ष उत्तर देतात तर काही Self Attitude दर्शवणारे स्टेटस आहेत जे तुम्ही तुमच्या WhatsApp वर शेअर करू शकता.
मी वाईट नाही, फक्त मला जे आवडत नाही तिथे मी राहत नाही.
जळणाऱ्यांनी जळत राहावं, आम्ही असंच तळपत राहणार.
बाजीराव नाही, पण राज आपलाच आहे.
नाव खराब झालं तरी चालेल, पण कोणाचं फालतू ऐकणार नाही.
चुकीला माफी नाही, आणि माफीला जागा नाही.
आदर दिला तरच आदर मिळेल.
स्वभाव शांत आहे, म्हणून आम्हाला वेड्यात काढू नका.
दुश्मनांची संख्या वाढली म्हणजे समजायचं आपण प्रगती करतोय.
स्वतःचे मालक बना, गुलामी करायला खूप लोक आहेत.
आमची दुनिया वेगळी आहे आणि आम्ही पण वेगळे आहोत.
बोलायची हिंमत नसेल तर मागे बडबड करू नका.
आयुष्य लहान आहे, रुबाबात जगा.
तुमच्या जळण्याने आमचा काहीच तोटा नाही.
संघर्ष माझा, यश माझं, तुमचं काय जातंय?
रुबाब रक्तात असावा लागतो, कपड्याने फक्त दिखावा होतो.
शांत राहणं शिका, उत्तर काळ देईल.
जगात नाव नको, फक्त लोकांच्या मनात जागा हवी.
णाचे पाय ओढण्यापेक्षा स्वतःचे पाय भक्कम करा.
वेळेची वाट बघतोय, शिकार तर नक्कीच करणार.
आमची सावली पण तुमची झोप उडवेल.
आम्ही बदललो नाही, फक्त जगण्याची पद्धत बदलली.
लायकीनुसार वागा, मान मिळेल.
वाईट दिवसात सोबत राहणाऱ्यांची किंमत कधीच कमी होणार नाही.
बापाचं राज्य नाही, पण साम्राज्य स्वतःचं आहे.
मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की मी खेळ संपवलाय, फक्त पुढच्या चालीची तयारी करतोय.
लायकीची गोष्ट आमच्यासमोर करू नकोस, कारण तुझे 'ब्रँड' आम्ही कधीच सोडून दिलेत.
ओळख तर कुत्र्यांची पण असते, पण दरारा हा वाघाचाच असतो.
तू काय माझं नाव खराब करणार? माझं नाव खराब करायला पण तुला माझीच ओळख सांगावी लागेल.
लोकांचं कामच आहे बोलणं, आणि आमचं काम आहे त्यांना बोलायला कारण देणं.
कोणाच्या मागे उभं राहून राजकारण करायची सवय नाही, जे काय आहे ते समोरून आहे.
Conclusion
मित्रांनो, आजच्या सोशल मीडियाच्या काळात Attitude दाखवणे ही एक Styleच बनली आहे. लोकं थेट बोलण्यापेक्षा स्टेटस द्वारे आपले विचार व्यक्त करतात. टोमणे स्वरूपात असलेला Attitude Tomne Marathi Status संग्रह तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा आहे. तसेच WhatsApp Attitude Tomne Marathi Status ह्या विभागातील मजेशीर आणि टोमणे स्वरूपातील संदेश तुम्हला नक्कीच आवडले असतील. हे संदेश तुमच्या सोशल मीडियावर नक्कीच शेअर करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीचा Response काय येतोय ते नक्की पहा.
FAQ
१. Attitude Tomne Marathi Status म्हणजे काय?
उत्तर - आपल्यावर जळणाऱ्या लोकांना टोमण्याच्या स्वरूपात उत्तर देणारे स्टेटस.२. Marathi Attitude Status खास का वाटतात?
उत्तर - कारण हे स्टेटस मराठी भाषेतून असल्यामुळे आपण आपल्या मनातली टोमणे स्वरूपातली भावना सोप्प्या आणि प्रभावी शब्दात मांडू शकतो.३. WhatsApp Attitude Tomne Status कुठे वापरता येतो?
उत्तर - हे स्टेटस WhatsApp Status, Instagram Story आणि Facebook Post मध्ये वापरू शकता.