Shayari For Girlfriend - गर्लफ्रेंडसाठी खास शायरी.
प्रेम ही एक अशी भावना आहे जी शब्दांत सांगणं कठीण असतं… पण शायरीच्या रूपात ती सहज आणि सुरेख पद्धतीने व्यक्त करता येते. 'Shayari For Girlfriend' हा शब्द फक्त एका रोमँटिक ओळीत गुंफलेला नाही, तर हा एक भावनांचा झरा आहे; ज्यातून प्रेम, आदर, आणि जिव्हाळा वाहतो.
आजच्या या डिजिटल युगात, Instagram, WhatsApp, Facebook वर शायरीच्या इमेजेस शेअर करणं हे फक्त एक सवय नाही, तर एक भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग बनला आहे. मग अशा खास क्षणांसाठी आणि आपल्या GF ला स्पेशल फील करून देण्यासाठी खास मराठी शायऱ्यांचा संग्रह तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Shayari For Girlfriend
गर्लफ्रेंड च्या हृदयाला भिडणारी शायरी शोधताय? 'Shayari For Girlfriend' ह्या विभागात पहा प्रेमाने भरलेली, भावनिक आणि रोमँटिक मराठी शायरी खास तुमच्या गर्लफ्रेंडसाठी.
जवळ असशील तर मिठीत घेईन,
दूर असशील तर आठवणीत जपून ठेवीन..

प्रेमाला
नाव नसलं तरी,
तुझं नाव घेताच मन शांत होतं..

तुझं प्रेम म्हणजे,
माझ्या अस्तित्वाचं सुंदर कारण..

मनात खूप काही बोलायचं असतं,
पण तुझ्या हास्याने सगळं विसरतो..

तू असशील तर
आयुष्य सोप्पं वाटतं,
कारण तुझं प्रेम माझ्यासाठी
सर्वस्व आहे..

तुझं नाव घेतलं की हसणं येतं,
कधी कधी डोळ्यांत पाणीही..

प्रेम म्हणजे तू,
तुझ्या आठवणीत जगणं म्हणजे
आयुष्य..

मनातलं प्रेम शब्दात सांगता येत नाही,
फक्त तुझ्या डोळ्यांत पाहून समजतं..

आयुष्यभरासाठी
एकच मागणी आहे
“ तू आणि तुझं प्रेम..”

तू फक्त नावात नसावीस,
तू माझ्या प्रत्येक श्वासात असावीस...

प्रेम म्हणजे
फुल नाही,
प्रेम म्हणजे
तुझी साथ..

शब्द कमी पडतात,
पण तुझ्यासाठी
मन भरून येतं..

तुझ्या आठवणीत
दिवस जातो,
तुझ्या स्वप्नात
रात्र सरते..

प्रेमात शब्द कमी,
भावना जास्त असतात...

तू इतकी
खास आहेस की,
प्रत्येक क्षणात
तुझं नाव आठवतं..

तुझ्यासाठी माझं प्रेम इतकं खरं आहे,
की ते शब्दात मांडता येत नाही..

प्रेमाच्या या प्रवासात,
तू माझा नकाशा आहेस…

प्रेमात मी हरलो,
पण तुझ्यात मी सापडलो…

तुझं प्रेम
साठवून ठेवलंय,
मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात..

तू माझं मन नाही,
तू माझा आत्मा आहेस...

तुझं प्रेम म्हणजे श्वासासारखं,
असल्यावर जाणवत नाही, पण
नसल्यावर जगताच
येत नाही…

तू सोबत असताना,
आयुष्य सुंदर
वाटतं…

तू जवळ नसलीस
तरी,
तुझ्या आठवणी
माझं हृदय भरतात…

तुझं प्रेम म्हणजे
ती शांत झुळूक,
जी मनाला
गारवा देते…

कधीकधी शब्द
अपुरे पडतात,
पण तुझं प्रेम
सर्व काही सांगतं…

तुझ्यासोबत भविष्य घडवायचं आहे,
फक्त तू सोबत चालशील का?

Conclusion
मित्रानो, Shayari For Girlfriend ह्या संग्रहामधील तुमच्या गर्लफ्रेंड साठी तयार करण्यात आलेल्या शायऱ्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील.
ह्या संग्रहातील शायरी Images तुम्ही तुम्ही तुमच्या मोबाइलला मध्ये Save करून तुमच्या Facebook, WhatsApp स्टेटस ला ठेवू शकता आणि तुमच्या भावना तुमच्या गर्लफ्रेंड सोबत शेअर करू शकता.